संयम
संयम
1 min
12K
लांबुनच बढाया मारणारे भेटतील तुला
काळजी वाहणारे इथे ना भेटतील तुला !
प्रामाणिक तु झटत राहशील निस्वार्थी
विचलित करण्या ध्येय...
शब्द बोचरा बोलतील तुला !
माहीत नसता सत्य कुठलेही
उगाच अडथळा आणण्या,
दळभद्रे टोकतील तुला
संयम तुझा अनमोल दागीना
काढुन घेतील नतद्रष्ट ते
पार्वती लंकेची करतील तुला...