STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

संत भगवान बाबा

संत भगवान बाबा

1 min
11.5K

संत भगवान बाबांच्या प्रतिमेचे 

घ्यावे रोज, रोज दर्शन 

होईल धन्य आपले जीवन 

त्यांच्या आदर्श प्रेरणेेतून  


घरा घरात दिसावा फोटो भगवान बाबांचा 

मंदिरात दिसावा फोटो भगवान बाबांचा 

मनामनात रुजावा विचार भगवान बाबांचा 

रक्तारक्तात भिनावा अभिमान बाबांचा  


त्यांचे आदर्श आहे जीवन 

प्रेरणा घ्यावी त्यांच्या जगण्यातून 

नित्य आठवण ठेवावी भगवान गडाची 

एकात्मता दिसावी प्रत्येकाच्या रक्ताची  


सर्व मानवजातीला आदर्श बाबांचा आयुष्याचा 

नित्य राखावी संस्कृती आदर करावा मूल्यांचा 

सदाचरण असावे बाबांच्या आदर्शावर 

अभिमान असावा त्यांच्या सत्त्व परिक्षेवर  


जोड असावी अध्यात्म्याची 

जीवन सार्थकी लावण्याची 

जन्माला येईल तेव्हा अर्थ 

समाजसेवेचे व्हावे सार्थ  


जावे दर वर्षाच्या वारीला 

स्पर्श करण्या भगवान गडाच्या मातीला 

आदराने माथा टेकावा बाबांच्या चरणाला 

भगवान गडाच्या मातीचा टिळा लावावा भाळाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन