संसार
संसार
1 min
39
राजा राणीच्या संसारी,
होती ही माणसं सहा,
दीर, नणंदा, सासरे,
सारे प्रेमळ हे पहा.
असे दिवसभर हे,
सर्व कामातच व्यस्त,
संध्याकाळी सगळ्यांची,
जमे पंगत ही मस्त.
सहा हो वर्षांनंतर,
झुले पाळणा तो घरी,
प्रेमरूपी संसारात,
आली एक गोड परी.
घरकुल भरलेलं,
उणे इथे काही नाही,
सात माणशी कुटुंब,
मिळे उसंत हो नाही.
