समजून घेना
समजून घेना
1 min
228
एक मेका समजून
घेणे चांगला विचार
होतो सुखाचा संसार
नको कोणा अत्त्याचार
चुक ही होत असते
अढी नसावी मनात
मन हवे सदा मोठे
क्षमा करण्या क्षणात
असे समजून रहाता
वेळ येत नाही कधी
समजून घे ना शब्द
बोलणे येते कधी- मधी
पण होत नाही तसे
शब्द शब्दाला लागतो
खरा मीच दाविण्यात
समजुतीचा प्रश्न संपतो
समजूत दार पणा हवाच
कालांतराने येता समज
येत जातो तो स्वभावात
"समजून घे ना* ची नुरते गरज
