STORYMIRROR

Anuradha Kadam

Others

2  

Anuradha Kadam

Others

सख्या पावसा रे

सख्या पावसा रे

1 min
13K


सख्या पावसा रे

कुठे दडलास बोल

जीव करुन कोरडा

का रे झालास अबोल 

सख्या पावसा रे

तुझी वाट किती पाहू

जीव झुरे रे सारखा

डोळे लागलेत वाहू

 सख्या पावसा रे

तुझी ओली आठवण

घाली काळजाला भूल

नाही पळभर चैन

 सख्या पावसा रे

तूझ्या बेभान त्या सरी

किती आठवू सांग ना

सय मायीना ही उरी

 सख्या पावसा रे

आता येना परतून

आसुसली काया सारी

टाक चिंब भिजवून

 


Rate this content
Log in