अडकुनी त्याच्यात...
अडकुनी त्याच्यात...
1 min
26.8K
अडकूनी त्याच्यात पुन्हा बेबंद होणे जमलेच नाही
कितीही घालुनि पायबंद तूफ़ान हे शमलेच नाही
वाट वेगळी म्हणून वळवली पाऊले तरीही
चालताना या इथे मन कधी रमलेच नाही
कितीही केला देखावा न उधळली हास्यफुले
त्या सुखा इतके कशात मला कधी गमलेच नाही
झाला जरी विद्रोह अन तोडली गुलामी त्याची
हेही खरेच त्याच्याशिवाय मी कुठे नमलेच नाही
