STORYMIRROR

Anuradha Kadam

Others

2  

Anuradha Kadam

Others

जातोस जेव्हा तू दूर...

जातोस जेव्हा तू दूर...

1 min
14.1K


जाणीव तुझ्या नसण्याची

मन कासावीस करते...

जीव तडफडतो सारखा

श्वासांची वीण उसवते.

खळखळत्या झऱ्याचा

जणू थांबतो प्रवाह.

जाते विरुन हसणे

सोसता तुझा विरह.

क्षितिजाशी टेकलेले

भासे उदास ते नभ.

निरभ्र आभाळातही

दाटे क्षणात मळभ

हिरवाई रानातली

होते मुकी अबोल...

डोहात आठवांच्या

जाते बुडून खोल...

अंधारल्या दिशांना

न दिसे संधीप्रकाश...

उजळे न कोठे पणती

भासे रजनी ही उदास...

माझे मला न कळते

कुठे हरवतो सूर...

हुरहुरतो गंध फुलांचा

जातोस जेव्हा तू दूर


Rate this content
Log in