STORYMIRROR

Anuradha Kadam

Others

2  

Anuradha Kadam

Others

जीवना...

जीवना...

1 min
13.6K


रोज दाखवतो आरसा

तेच का आयुष्य माझे

देहाच्या थडग्यावर

दुःखाचे गुलाब ताजे 

मेलेल्या कातडीवर

वळ तो उमटेल कसा

जीवना बास कर

आतातरी आघात तुझे 

कोणास ठाऊक काय आहे

अंत माझा कशात

स्मशानात जाताना

कोण माझे वाहील ओझे 

अश्रुंचे आले न

थांबवता प्रपात मला

बघ जीवना राहिलेत का

अजून अमानुष हल्ले तुझे

 


Rate this content
Log in