STORYMIRROR

UMA PATIL

Others

3  

UMA PATIL

Others

सखा पांडुरंग

सखा पांडुरंग

1 min
458

विठू नामातले। कसे वर्णू सुख।

विसरले दुःख। जगताचे ॥१॥


सदैव पाठीशी। तू विठू माऊली।

राहू दे सावली। भक्तांवरी ॥२॥


आषाढी, कार्तिकी। वारी चालू नित्य।

नाम एक सत्य। माऊलीचे ॥३॥


विठ्ठल विठ्ठल। वारकरी दंग।

एक झाला रंग। वैष्णवांचा ॥४॥


टाळ मृदुंगाला। माऊलीची जोड।

त्याला नाही तोड। अखंडीत ॥५॥


सखा पांडुरंग। प्रचंड ती शक्ती।

सदा करू भक्ती। सावळ्याची ॥६॥


'उमा'वर ठेव। नित्य कृपादृष्टी।

आनंदाने सृष्टी। बहरावी ॥७॥



साहित्याला गुण द्या
लॉग इन