STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Others

4  

आ. वि. कामिरे

Others

शत्रू

शत्रू

1 min
214

शत्रू नाही तो ,जो समजतो आपण एखाद्याला

किंवा नाही तो तुमचा वाईट चिंतणारा

शत्रु तर आहे तो , जो दाखवतो दुष्टता तुम्हास

सर्वकाही दिसूनही कमी पडलो ते समजण्यास

कारण या मानवविश्वात एकच शत्रु आहे असा 

ज्यामुळे उद्धवस्त होतात घरे त्याला हवा तसा


नाही तो कोणता व्यक्ती ना आहे समाज 

त्यास समजून घेण्या आपण कमी पडलो आज

आहे हा शत्रु प्राणघातकी 

त्यास जवळ केल्या व्हाल आत्मघातकी

नाही दुसरा कोणीही ना आहे तुमचा शेजारी

त्यांच्यावर संशय घेत पडू नका आजारी

कारण हा तर आहे तुमचाच विचार 

ज्याला नाही कोणते आचार


कधी ?केव्हा ?कोठे ?कसे करेल

हे ज्याला कळले तोच टिकेल

विचारच घडवतो आपल्याला

आणि तोच बिघडवतो तुम्हाला

ह्या जगात नाही कोणी शत्रु कोणाचे 

तरी नेहमी नियंत्रण का विचाराचे

विचारांची ही कला समजली जयाला

तो गेला मोक्ष प्राप्तीला

म्हणूनच तर विचारच आहे शत्रू खरे

गरज पडल्यास त्येच होतात मित्र न्यारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन