STORYMIRROR

Mangesh Medhi

Others

3  

Mangesh Medhi

Others

श्रेय

श्रेय

1 min
523


ही रंगात येते तेंव्हा हिला

अर्धा कोरा कागद ही चालतो

पण रूसल्या वर मात्र

नवा कोरा सुगंधी ही नको


नशीबवान मी

की अशी प्रेयसी लाभली

ती भरभरून देते

मागत काहीच नाही


तीला बोलवाव, आठवाव

अस काहीच नाही

हवं तेंव्हा, हव तस येते

हलकेच पाठीशी, गळ्याशी

ह्रदयी बिलगते


हात पुढे करायचीही

गरज नाही

तीला कसलेच बंधन नाही

मला लपवायची गरज नाही


तिच्या मुळेच तर ओळख माझी

पसरते ख्याती

ती रोज ऐकवते, दाखवते

एक कहाणी नवी, अनोखी

तीची तीच प्रकटते


लिहीतो त्या शब्दातूनी

मी, माझ अस काहीच नाही

तीचेच सारे, श्रेय ही


साहित्याला गुण द्या
लॉग इन