शरद पवार साहेब -
शरद पवार साहेब -
महान योद्धा समाजवीर
ज्यांचे आदर्श संस्कार आणि विचार
महाराष्ट्राचे भाग्यविधाता आहे थोर
क्रांतीवीर महाराष्ट्राचे शिल्पकार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवूण
देशाचे कृषीमंत्री,पद सांभाळून
आम्हां आहे सार्थ अभिमान
कला,क्रीडा,साहित्य ,शिक्षण
दिले सर्व खेळाडूस उत्तेजन
दिला शेतकर्यांस मान,सन्मान
झाले शेतकरी,कामगारांचे आधार
शेतमजूर,नोकरदारांचे प्रश्न सोडविले गंभीर
शरद पवार साहेब,महाराष्ट्राची गर्जणारी तोफ
भारतातील शेतकर्यांचे केले कर्ज त्यानी माफ
क्रांती केली राष्ट्रवादी पक्ष स्थापून
गोरगरीबांचे केले त्यानी कल्याण
कार्य कर्त्याना मिळाला सन्मान
कार्य चालले अती वेगांने
खरोखर त्यांचे उपकार
महाराष्ट्राचे थोर धुरंधर
दीन दलितांचे कैवारी,सर्व जातीधर्माचे आधार
होवोनी अनाथांचे नाथ,गरीबांचे जनाधार
राज्य,देशावरची संकटे पाहून
हृदय जाते त्यांचे हेलावून
संघर्ष केला मोठ्या हिंमतीन
देशाला वाचविले संकटातून
भल्याभल्याना राजकीय टक्कर
गाठले यशाचे भव्य शिखर
बेरोजगाराना देऊन रोजगार
दोन वेळच्या भाकरीचा आधार
जाण आहे शेतकरी राजाची
कामगार मजूर वर्गाची
काळजी त्यांच्या हृदयात
भले गरीबांचे त्यांच्या मनात
राष्ट्रवादीचा झेंडा फडकतो
आवाज कार्यकर्त्याचा घुमतो
जनसामान्याना देऊन आधार
बनविले नगरसेवक ,आमदार,खासदार
राष्ट्रवादी पक्ष विकास करणार
नाही विरोधाला घाबरणार
मागे कधीच नाही हटणार
मार्ग सत्याचाच धरणार
सूर्य,चंद्राच्या साक्षीत
नाव राहील भारतात
नाव राहील जगात
नाव राहील इतिहासात.
