श्रावण
श्रावण
1 min
35
निसर्ग सौंदर्य । श्रावण मासात
आनंद मनात । खूप वाटे ।। १ ।।
श्रावण पाऊस । दाटे हिरवळ ।
गंध दरवळ । चोहिकडे ।। २ ।।
ऊन पावसाचा । खेळ चाले छान ।
आभाळी कमान । सप्तरंगी ।।३ ।।
व्रत वैकल्यांचा । सोम, शनि, गुरू ।
उपवास धरू । भक्तिमार्गी ।। ४ ।।
दही हंडी काला । कृष्ण सखा मेळा ।
गोविंदा सोहळा । गल्लोगल्ली ।। ५ ।।
श्रावण महिना । मंगळा गौरीचा ।
झिम्मा फुगडीचा । खेळण्याचा ।।६ ।।
श्रावण ऋतूत । वर्षाव मेघाचा ।
क्षण आनंदाचा । प्रत्येकाचा ।। ७ ।।