STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

शपथ हद्दपारीची

शपथ हद्दपारीची

1 min
804

माणसानेच ठरविले,

होळी करायची जीवनाची.

निसर्गाला देऊन आव्हान,

रास लावली रोगांची.

निसर्गाने दिले भरभरून,

नाही ठेवले हातचे राखून.

हिरव्या गार पर्वत राशी,

नद्या अनंतात अमृत वाहुन.

घरे सुंदर, मोठी लहान,

घरभर वारा वाहे छान.

मुबलक सुर्य प्रकाश,

रोगराईला नव्हते स्थांन.

पुर्वी घरे होती मातीची,

अंगणात रांगोळी सजायची.

धुप दिप लावुनी संध्येला,

घरादारात रोशनाई व्हायची.

खुल्या आसमंता खाली,

जीवनाची वाढायची पालवी.

ताजे तवाने शरीर राहायचे,

मागुन पुढे,वरून खाली.

पाडली धर्मस्थळे, धर्म हि सोडला,

सोडुन नामस्मरण, केले नामांतर.

संस्कार सोडून, केले अनुकरण,

आपल्या सभ्यतेला देऊन अंतर.

सोडली अंघोळ, सात्विक भोजन,

पोटासाठी जीवाची वनवन.

रित बदलुन, चाल बदलुन,

काळ बदलला, रात्रीचा दिवस करून.

गावे संपवली, शहरे वाढली,

जंगले कापून शहरे वसवली.

शस्त्रे सामुग्री कमी पडली,

म्हणुनच काय हि विषाणू घडवली.

गळा भेटण्याची रित आपली,

पण,माणसा माणसात हि पडली दरी.

भीती भेटण्याची वाढली इतकी आता,

हात मिळवण्याची ही झाली चोरी.

वाढवा आपुलकी माणसातली,

वाढवा धर्म माणुसकीचा.

हे करू नका,ते करू नका हे,

खुप झाले पाडा फर्शा कोरोना रोगाचा.

आली गेली अशी किती संकटे,

देश माझा डगमगला नाही.

भारत देश आपला आहे महान,

लेच्यापेच्याला हा घाबरणारा नाही.

येऊन आपण सर्व एकत्र,

संयम पाळु काळजी घेऊ.

या रोगाला करू हद्दपार,

सर्व मिळून शपथ ही घेऊ


Rate this content
Log in