शनिवार सुप्रभात कुंद कुंद...!
शनिवार सुप्रभात कुंद कुंद...!
श रम कशी वाटत नाही...?
नी लाज कशी वाटत नाही..?
वा त आला ऐकून ऐकून
र डगाण यांच पुन्हा पुन्हा पाहून
सु खा सुखी नसती ब्याद आता
प्र चंड मनस्ताप सहन करायला लावते
भा ळीचे सोभाग्यच दुर्भाग्य वाटते आणि
त डफड जीवाची आणखीनच वाढते
कुं तून कुंतून वाटते लोकशाही कण्हते
द मदार जीवन आता मरगळून पडते
कुं कुम तिलक भाळीचा आता जरा
द मा दमानच रेखावा वाटते
या लोकशाहीत प्रत्येक जण
वेगळाच धडा शिकवून जातो
मूर्खांच्या रांगेत मतदाराला बसवतो
आणि आपलीच पोळी नेता भाजून घेतो
वाटते कुंद कुंद आजची सकाळ
यांच्या मुळेच विटाळली असावी
निदान एकदातरी यांच्या डोक्यात
देवा तू आता थोडी सद्विवेक बुद्धी घालावी
म्हंटले मनाशीच हे असेच चालणार
आम्ही आपले बघतच राहणार
पण एक आशा सुप्रभाती जागली
निदान देश भक्तीने तरी थोडी उचल खाल्ली....!
सुप्रभात...!
