शनिवार सुप्रभात किती छान..!
शनिवार सुप्रभात किती छान..!
1 min
225
श तका नंतर आज पहिली
नि र्मळ कोमल शामल पहाट
वा टेवरती पडता सुवर्ण सडा
र म्य आठवणींचा सांडला घडा
सु वर्ण कांचन योग सुंदर
प्र सन्न चित्त हे झाले
भा ग्य माझे इच्छामात्रे
त त्पर रविराज भूवरी आले
कि ती माया ममता हृदयी
ति तकीच करुणा त्याच्या अंतरी
छा न छान सुवर्ण क्षणांची
न कळत केली पहा विपुल बरसात....!
सुप्रभात...!
