STORYMIRROR

Asmita Sawant

Others

2  

Asmita Sawant

Others

सहज

सहज

1 min
154

सगळ्याच गोष्टी सहज मिळत नाही आयुष्यात प्रत्येक वेळी नातं टिकवण्यासाठी किंमत मोजावी लागते. कधी शांत तर कधी मानसिकता

चांगली नसतांना स्वीकारल्या जातात तत्वात न बसणा-या गोष्टी. कमी पणा प्रत्येक वेळी घेणं म्हणजे स्वाभिमानाला ठेच लागणारच ना; त्याची कळ हृदयापर्यंत जातेच ना;.तरीही हसायचं तरीही लपवायचे अश्रू आणि स्वतः ला फसवत किती वर्ष जगायचं?काही माणसांचा स्वभाव ओळखून त्यांच्याशी बोलणं,व्यवहार करतात ना सगळे फक्त त्यांच्या तोंडावर बोलायला कुणी तयार होत नाही कारण वादाचे कारण बनायचे नसतेच पण निदान ते त्यांच्या प्रमाणे जगतात तरी आणि आपण सगळ्यांचा विचार करता करता ना त्यांचे ना स्वतः चे होतो इतका माणुस हतबल होतो . 

   खरं तर जगावं आपल्या परीने आपल्या कलेने आपल्या हातात हेच आहे ते म्हणजे जगणं . मग ते सुरेख करण्यासाठी नकारात्मक विचारांना खतपाणी घालणं सोडायला हवं प्रत्येक वेळी सकारात्मक विचार करण्याचीच सवय लावली पाहिजे . अडचणींवर मात करण्याची सवय लावली पाहिजे. सगळ्याच गोष्टी जरी मनाप्रमाणे झाल्या नाहीत तरी जगणं सोडायचं नसतं आनंदाने पुढे जायचं असतं . आपण किती चांगली आहोत हे दाखवण्यासाठी जगू नका मात्र आपण काय आहोत आणि कशासाठी जगतो आहोत आपला जन्म कशासाठी झाला आहे हे मात्र जाणून घ्या.


Rate this content
Log in