मी एक झाड
मी एक झाड
1 min
14
भाग्य माझं महान
झालो मी एक झाड
जरी मी रूजलो आहे
डांबरी रस्त्यापल्याड
काळ्या धुरांच्या मारा
सहन करी पानं फांदया
कसा ओळखावा सांगा?
हिरव्या रंगाचा पिसारा
बहरत आहे मी असाच
मुळं खोलवर रुजवत
झ-याच्या शोधात तीही
खाली कातळाला चिरत
असेल कितीसे आयुष्य
का चिंता उगी करावी
जितके जगू तितके
सावलीच देत जावी
मातीचे उपकार जाणत
प्रत्येक श्वास घेत आहे
उडत्या पक्ष्यांकडे पाहून
आभाळी झेप घेत आहे
आभाळी झेप घेत आहे
