मर्म आयुष्याचे
मर्म आयुष्याचे
प्रत्येक पाऊल वाटेवरचे
अनंत जरी दु:खाचे
अवघड वाटे लक्ष तरीपण
अनुभव हे शिकण्याचे
प्रवास जगण्याचा हा अपूला
आपणच आपला करावा
कायम सोबत असेल कुणी
हा हट्ट ना मुळी धरावा
न कळणाऱ्या रस्त्यावरूनी
जरा सांभाळून चालावे
उगीच चुकलेल्या रस्त्यावर
पुन्हा ना भटकावे
कसे जगावे प्रश्नच पडती
परी उत्तरे ही मिळतील
शोध स्वतः चा घेतांना
जरा त्रासच मग होईल
जगेल किती का कुणी
ते ना प्रत्येका माहित
कसा जगला हे मात्र विचारातील
आरशातले प्रतिबिंब
कार्याने सिद्ध करीतच जावे
सोने करा संधीचे
आत्मबल हे वाढत जाते
तेव्हा मग जगण्याचे
माणुसकीची भिंत उभारू
कास धरू ऐक्याची
आत्मविश्वासाने पूढे जावू
गाणी गाऊ समतेची
मंत्र नव्हे हे तंत्र जगूया
निर्मळ आयुष्याचे
विश्वासाने उलगडते
हे मर्म आयुष्याचे
