एकटा हा श्रावण 🖊अस्मि
एकटा हा श्रावण 🖊अस्मि
1 min
140
श्रावणातला प्रत्येक पाऊस
आठवणींचा झूलता हिंदोळा
कधी ऊन पडे मध्येच सावली
वा-्यावर झूलतो मन जोंधळा
गाण्यातला सुरातून छेडणारा
गारव्याचा होतो स्पर्श अलवार
तुझ्या नावाचेच गीत गाते
होऊनी राग मेघ मल्हार
सरीवर सरी येतात तश्या
तसे मनही होतेओलेचिंब
काही न बोलता नुसतेच
ओघळलेले कागदावर टिंब
काहूर दाटे मनी निरंतर
आठवे तो प्रत्येक श्रावण
गेला परतीसारखा विरूनी
छळतो मज एकटा हा श्रावण
