गुलाबी थंडी
गुलाबी थंडी
1 min
117
बदलले ऋतुमान
झोंबतो मौसम फार
गुलाबी थंडीने झाले
सारे बघा गार -गार
स्वेटर घेईल कूणी
कुणी घेईल शालही
गरीबांच्या दारी मात्र
घेते पेट शेकोटीही
धूकं पसरे भूवरी
दवं पडे गवतात
पाहूनी हे सारे दृश्य
दाटे आठव मनात
होता दिवसही सुरू
रात्र ही लगेच सरे
लपंडाव ही खेळता
हळूच वाहती वारे
काटा येई अंगावर
कसा ऋतू बेईमान
निद्रा येता डोळ्यावर
उठावे लागे गुमान
