STORYMIRROR

vaishali vartak

Others

4  

vaishali vartak

Others

शिंतोडै

शिंतोडै

1 min
324

होते पाहात बागेत

मनोहर पुष्करणी

अंगी पडता तुषार

जाग्या झाल्या आठवणी


जात होते वाटेतून

होते साचलेले पाणी

गाडी जाता भरधाव 

आली बघा आणिबाणी


चिखलाचे ते शिंतोडे

परिधान वस्त्रावरी

किती घाणेरडे पाणी

नको झाले क्षणभरी


पुढे जाता बरसल्या

वर्षा धारा जोरदार

गेले निधून पाण्याने

शिंतोड्याचे डाग चार


थेंब तुषार असती

सारी रुपे शिंतोड्याची

अती अल्प प्रमाणात

रूपे सारी ती पाण्याची


वैचारिक शिंतोडे ते

करी मनास प्रफुल्लित

विचाराने मन होई

सदासाठी आनंदित


साठलेले ते विचार 

मनरूपी कारंज्यात

हास्यरुपी शिंतोड्यांची

करतात बरसात


मोदभर हास्याचे ते

सदा तुषार उडावे

बेअब्रूचे ते शिंतोडे

जीवनात न पडावे


Rate this content
Log in