शहीदाना आदरांजली
शहीदाना आदरांजली
1 min
285
पेट्रोलिंग करत असतांना
हमला केला त्यांनी लपुन
पोलिसांनी सांगा डयूटी
किती किती करावी जपून।।
काय होता दोष आमच्या
पोलिस बांधवाचा यात
बेसावध असतांना केला
टपुन बसून त्यांनी घात।।
मरणाला आमचा पोलिस
कधीच मागे नाही हटत
समाजात शांतता राहावी
म्हणून नेहमी असतो झटत।।
दिवसरात्र एक करून तो
लावतो आपल्या जीवाची बाजी
एक पोलिसच असा आहे जो
असतो प्राण देण्यास राजी।।
या शुर शहीद पोलिसांना
नम्रपणे आदरांजली वाहू
परत अशी घटना न घडो
यासाठी काळजी घेत राहू।।
