शेकोटी
शेकोटी
1 min
1.0K
हिवाळ्याचे दिवस हाये
दमादमानं चालत जाय
गवतावरल्या दडाले
दयामाया दावत जाय
कापसाचे बोंडं जरा
काढ हाळूहाळू
फुलावाणी बोटं तुहे
नको दिऊ साळू
जाळ्या-जुळ्या, काट्याकुट्यात
कधीच जऊ नको
सोन्यासारके केसं तुहे
तुटू दिऊ नको
आंधाराच्या आधीच
वावरातून घरी ये
कोन्हाचा काय भरोसा
चांगले नही लोकं ते
थंडीच्या आधी घालू
दोनदोन घास पोटी
दोघं मिळून पेटवू मंग
घरात एकच शेकोटी...
