शब्दांची गुंफण
शब्दांची गुंफण
1 min
220
शब्द असे अनमोल
जपा त्यांना निरंतर
शब्द असे कडू गोड
वाणीतून निरंतर.
वाणी असावी सुंदर
करा गुंफण शब्दांची
छान मधूर कोमल
मैत्रि करे ती मनाची.
शब्द कठोर बोलुनी
करी घायाळ मनास
शत्रू बने हृदयास
नको बोल ते कुणास.
वार शब्दांचा तो खोल
हृदयात करी वास
दुःख देई अहोरात्र
आयुष्यास देई त्रास.
गुंता मवाळ प्रेमळ
शब्द माळ ती शब्दांची
उपयोगी आणा सदा
जपा नाती ती प्रेमाची.
