शब्द सरी बरसल्या
शब्द सरी बरसल्या
1 min
178
मनी दाटलेले भाव
हाती घेता लेखणीला
शब्दसरी बरसल्या
धारा भेटल्या मातीला
असे गुज अंतरीचे
उमटवे ती लेखणी
शब्द सरी बरसता
भासे मजला देखणी
शब्दसरी बरसल्या
जणु मेघवर्षा आल्या
आहे नवरस पूर्ण
मन भावन ठरल्या
शब्द सहज झरता
कवी हृदयाचे भाव
शब्द शब्द जोडुनिया
घेई अंतरीचा ठाव
शब्द असती सुमने
नाना रंगी उधळण
भक्ती शौर्य धैर्य शांत
जणु शब्द पखरण
