शब्द माझे सोबती
शब्द माझे सोबती
1 min
115
येता मनात विचार
येती अस्फूट अधरी
किती घाई ती तयांना
उतरण्या कागदावरी
शब्द माझेची सोबती
बोलणेही ते शब्दांशी
उरातल्या स्पंदनाना
तोलणेते भावनेशी
चाले खेळ हा शब्दांचा
येती धावत सहज
जणु खुणावूनी वदती
आहे माझीच गरज
प्रेम भाव तयावर
करी हसूनी स्वागत
खरोखरी माझे साथी
पूर्ण करिती मनोगत
शब्द फुले गुंफुनीया
होते तयार कविता
देते मजला आनंद
होते मनाची पूर्तता
