शब्द जोडुनी
शब्द जोडुनी
1 min
316
काव्य सुंदर असे रचावे
भाव मनाचे
प्रगट करुनी दाखवावे.
मन मोकळे
शब्द अंतरिचे ते लिहावे
भिती नसावी
सत्य सर्व लोकां ते कळावे.
जगणे नको
भार आता सहन होईना
अंतर आत्मा
मला शांतच राहू देईना.
परोपकार
वृत्ती अंगी बाळगावी सदा
श्रध्दा असावी
असत्य धारण नको कदा.
वाचावे ग्रंथ
ज्ञान संपादन ते करावे
लोका देऊनी
थोडे पुण्यकर्म कमवावे.
