शब्द अपुरे पडले
शब्द अपुरे पडले


शब्द अपुरे पडले माझे
रात्र गडद झाली
तुझ्या सोबतीने सख्या
रात्र धुंद झाली
थंडगार सुटला वारा
अंगावरी आला शहारा
लाजुनी मी नखशिखांत
तुझ्या घट्ट बाहूपाशात
मिटलेले डोळे माझे
अन थरथरती ओठ
तुझ्या स्पर्शाने चमकती
अंगी विजांचे लोट
धडधडत्या छातीवरती
टेकवावे निमूट डोके
तुझ्या मिठीत शिरण्याचे
मिळती अनेक मौके