STORYMIRROR

somadatta kulkarni

Others

4  

somadatta kulkarni

Others

शाळेची घंटा

शाळेची घंटा

1 min
667

पुन्हा वाजली शाळेची घंटा

लगबग सुरू झाली मुलांची

दोन वर्षांची सुट्टी संपवून

वेळेवर शाळेत पोहोचण्याची   १


पुन्हा वाजली शाळेची घंटा

मनात उस्तुकता भासतसे

गुरू जणांकडून शिकण्यास

विद्यार्थीवर्ग शाळेत येतसे     २


शाळा माझी सुरेख फार

गैर शिस्तीला नाही वाव

मास्तर प्रेमाने शिकविती

म्हणती नको कशाची हाव  ३


शाळा सरस्वतीचे मंदिर

गुरूजन आम्हांस दैवत

शिकवती आम्हांला सारे

करु सर्व आम्ही मुखोद्गत  ४


Rate this content
Log in