STORYMIRROR

Ranjana Lasane

Others

3  

Ranjana Lasane

Others

सौंदर्यवती

सौंदर्यवती

1 min
14.9K


तुझ्या लावण्याला तोड

नसे उभ्या ग जगती।

अशा सौंदर्यवतीची

कशी वर्णावी महती।।धृ।।


नाना अलंकार ल्याली

नवविध भूषणे सजली।

तुझ्या लावण्याची प्रभा

नाना छंदाने नटली।

जगी मानाचा ग तुरा

तुझ्या मुकूटा वरती।।१।।


तुझी शृंगारली बोली

जाग प्रणयाला आली।

केले कित्येक घायाळ

धुंदी शब्दांनी चढली।

मधुर रसाची उधळण

शब्द अमृतात न्हाती।।२।।


संत तुका चोखा नामा

करी अभंग गायना।

भक्तीरस मंथनाला

भूले पंढरीचा राणा।

ज्ञानीयांचा राजा जगी

तुझी वर्णितो महती।।३।।


वीर रौद्र शांत रस

किती निर्मिले सुरस।

हस्य करूण रसाला

भाव फुलांची आरास।

दीग्जांनी भूषविली

शब्द भूषणे ही किती।।४।।


भारूड गौळणी पोवाडे

लोकगीतांचा हा झरा।

करीती जन जागरण

देऊन संदेश हा खरा।

माय मराठी ही शोभे

राजभाषा स्थानावरती।।५।।


Rate this content
Log in