मदमस्त
मदमस्त
1 min
14.3K
मदमस्त ही हवा
नि छेडतो हा गारवा।
सांग कशी देऊ मी
साथ जो तुला हवा।
शांत धुंद पहाट ही
मदमस्त या दशदिशा।
थकले राबराब राबते
पुरवू मी कशी आशा।
ओढ लाविसी असा
रूसशी का रे राजसा।
फर्शी भांडे कपड्यांचा
मेळ लावू मी कसा।
आर्त तुझ्या भावना
मम भाव इथे गुंतला।
उशीर रोज लावण्या
तो बॉस तिथे टपला।
हट्ट सोड रे आता
त्रास मीही झेलला।
संधीकाली या अशा
तूही नित्य थकलेला।
