सौंदर्य फॅशन
सौंदर्य फॅशन
पहा सृष्टी विधात्याची किमया न्यारी
स्त्री निर्मिली त्याने अफाट कष्टांनी
रंग, रुप, गुण भरले तिच्यात खूप
तरी सजते ती वेगळ्या फॅशनानी.
सिने नटी सारखे फॅशन करुनी
मुळ सौंदर्य टाकते ती बिघडुनी
काळ्या केसांच्या आंबाड्यावर वेणी
नऊवारी साडीत भासे रुपवती यामिनी.
फॅशनच्या नावाखाली अंग प्रदर्शनाची थेरे
स्त्रियांनाच लाज वाटे जी तिच्याकडे पाहते
अर्धा पगार तिचा खर्चिला जातो मेकपला
तरी सौंदर्यवती ती मुळीच नाही दिसते.
जमीन आसमानाचा फरक जाणवतो स्त्रीत
नितळ कांती रंग रुपाने साधारण असली
तरी रुपवती भासे तिच्या साध्या राहाणीने
पण तोकडे कपडे, मेकअपने ती दिसे नकली.
आठवते मज माझी आई रुपवती कामिनी
पावडरचा नुसता हात फिरवी चेहऱ्यावर
नऊवारी पातळ,भालावर लाल कुंकू नाजूक
मोगऱ्याची वेणी काळ्याभोर आंबाड्यावर.
आज ही स्त्रिया आहेत खूप सुंदर पण
फॅशनच्या आहारी जाऊनी वाट लावे सोंदर्य
वाटे तिजला मनी सौंदर्यवती तीच एकमेव
पण फॅशनात दडलयं सौंदर्य हेच तिचे दुदैर्व.
