सौभाग्यवती
सौभाग्यवती


करुणेचा सागर
कामाचा डोंगर !
हातात झाडू
नेहमी सदा !!
वाणीने गोड
प्रेमाचे लाड !
उभी स्वागताला
आतिथ्याच्या !!
कलेत निपुण
व्यवहार दक्ष !
मुलावर लक्ष
असे सदा !!
स्वयंपाकात सुगरण।
हात अन्नपूर्णा !!
भुकेला सदा
ढेकर देई !!
समारंभात सेवा
गालावर हास्य।
यजमान असे।
खुष सदा !!
माझ्या जन्माचे
झाले सार्थक !
अशी बहुगुणी
माझ्या हाता !!