सैनिक
सैनिक
1 min
288
भारतीय सैनिक
आम्हा लोकांची शान
सलाम करू त्यास
सदैव देऊ मान
स्वप्न साकारले तू
देशसेवी बनुनी
जीवाची लावी बाजी
त्या शत्रुशी लढुनी
न बाळगे तू तमा
थंडी ऊन वाऱ्याची
तत्पर तुझी काया
सीमेवर जाण्याची
निधड्या छातीचा तू
वार झेले शत्रुचे
सण साजरे करी
सारे आम्ही अमुचे
तुझे घरचे मात्र
तुझ्या आठवणीत
घास अडतो त्यांचा
ओठी तुझ्या यादीत
तिरंग्याची शान तू
फडकतो आकाशी
अभिमान तुझा तो
बाळगी देशवासी
धन्य मायबाप ते
पुत्र अर्पी देशास
निरोप देती तूज
सुखरूप येण्यास
पूर असो सुनामी
धावे तू मदतीस
देवरूप मानतो
त्या कर्तबगारीस
