STORYMIRROR

vaishali vartak

Others

4  

vaishali vartak

Others

सावली

सावली

1 min
389

कधी न देते अंतर

साथ देते ती सदैव

ध्यानी नसे आपणास

तीच साथी एकमेव


      छत्रछाया देती पालक

      अपार माया असे मनात

      तरी न कोणी तीज सम

      सोबती अंतकाळी जगात


जशी पडता सावली

अवनीची चंद्रावरी

जन म्हणती तया ग्रहण

खेळ चाले हा घटकाभरी


    व्यक्ती, वस्तू असो तीच

    तिचे बदले सतत आकार

    कधी मोठी, कधी छोटी

    दिसती तिच्या रुपाचे प्रकार


दोन्ही हाताच्या मदतीने

सावली दावी आकार

धरता हात प्रकाशात

प्रसंग पण होई साकार


     मेघ खेळती खेळ सूर्याशी

     नभी चाले तयांचा खेळ

     कधी ऊन कधी सावली

     घडे अवनीवर तिचा मेळ.


पडता सावली वृक्षांची

मिळे विसावा पथिकास

घेती सुखानंद सावलीत

किंमत कळे तिची जनास


Rate this content
Log in