सावित्री आई
सावित्री आई
1 min
284
जिजाऊ सावित्रीचा वारसा
चालवीन मी प्रामाणिकपणे
अन्याशी दोन हात करून
मिळाले धैर्य शिक्षणाने.....!!
तूच लाविलेस ज्योत
आणलीस ज्ञानाची गंगा
शाकून सवरून झाल्या शहाण्या
कोण अडाणी राहिले सांगा...!!
अज्ञान मिटविले वंचितांचे
विद्येची तूच खरी गाथा
तूच ज्ञानज्योती साऊ
विनम्र होवूनी टेकविते माथा..!!
तुझ्यामुळेच साऊ आज
शिकल्या आहेत प्रत्येक मुली
गगनभेदी घेतली भरारी
पूर्वी फक्त सांभाळत चुली...!!
