STORYMIRROR

Durga Deshmukh

Others

3  

Durga Deshmukh

Others

साऊ माझी

साऊ माझी

1 min
149



साऊ माझी ज्ञानाचा सागर

केला तिने शिक्षणाचा जागर


महात्मा फुले यांचे उपकार

घरीच उघडले ज्ञानाचे दार

समाजाच्या उद्धारासाठी 

सावित्रीला केले हुशार ||1||


बरबटलेल्या डोळ्यात अन् शेणाच्या गोळ्यात

स्त्रीयांच्या उद्धारासाठी 

तु ग मधमाशाच्या पोळयात


अंगावर झेलला घाणेरडा वास

या समाज व्यवस्थेने दिला किती त्रास 

ओल्या वस्त्राने चालताना 

तुटविले काट्याचे फास 2


फुल्यांची सावित्री तु ग ज्ञानाचा सागर

शिदोरी दिली तु ग आम्हा स्त्रियांना जीवनभर


तुझ्या ज्ञानाच्या उजेडात 

उभ आयुष्य चमकेल

माई सावित्री बाई ग

तुझ्या शिकवणीवर चालेल 3


पुण्याच्या भिडेवाड्यात

शिक्षणाची पेटविली ज्योत

घरोघरी जाऊन सांगे

मुलीच्या शिक्षणाचे स्

तोत 4


धर्म बुडाला आता जग बुडणारा

कर्मठ विरोधाने सोडावे लागले घर


अन्याय भेदभाव जात लिंगावर विधवांचे केशवपण नाही होणार

सगळ्यांना जरब बसवण्यासाठी

पुण्यात न्हाव्यांचा संप सादर 5


पुण्यात प्लेगची साथ होती भंयकर

सावित्रीच्या सेवेने मिळाला रोग्यांना आधार 


बाल जरठ विवाह प्रथा 

चालु लागली तिची लेखणी

बाल वयात विधवा मुली

स्त्रीवादाची ही जननी 6


सती केशवपण बलात्कार किती तुम्ही छळणार

काशीबाई विधवेचे मुल दत्तक घेऊन केला उद्धार 


सत्यशोधन समाज कार्याची

जबाबदारी केली पार

त्याचे लेखन काव्यफुले

बावनकशी सुबोध रत्नाकर 7


पहिल्या महिला शिक्षिका 

शिक्षणतज्ञ कवयित्री थोर

भारतीय समाज सुधारक हो

त्यांची किर्ती सातासमुद्रापार 


Rate this content
Log in