STORYMIRROR

vaishali vartak

Others

3  

vaishali vartak

Others

साथ दोरीची

साथ दोरीची

1 min
171

पतंगाची दोर 

सदैवच साथी

पतंग नभात

दोर राही हाती   ॥१॥


पतंग ,दोरीच्या  

बळावर स्वार

ढगांना करीतो

क्षणार्धात पार   ॥२॥


जीवन नौकाच

दोरीच्या हातात

तीच करविते

सफर नभात    ॥३॥


 ढिल देता जाई 

 उंच गगनात

जणु भासे खग   

 विहरे नभात    ॥४॥


पहा कसा मारी 

 सूर तो नभात

जणु की, मासोळी

ती जलाशयात   ॥५॥


मान वर काढी

लगेच तो-यात

सरसर घेई

भरारी नभात   ॥६॥


पतंगाचा दोर 

तुटता नभात

साथ संपताच

उदास क्षणात   ॥७॥   



Rate this content
Log in