सारे आकाश माझे
सारे आकाश माझे
1 min
459
कुटुंबाच्या इच्छापूर्तीसाठी
संसारात कष्ट झेलते
देऊनी स्वतःला झोकून
आकाश पण सहज पेलते
हृदयी मायेचा सागर
ममतेची असे सदा छाया
कठीण प्रसंग येता कधीही
तत्पर असे झिजवण्या काया
घरदार मुले कुटुंबियांना
सुखी करणे विचार ध्यानी
घडविणे संस्काराने शिल्प
हीच कल्पना सदा मनीं
सीतारमण संरक्षण मंत्री
भुषविले स्त्रीने मंत्री पद
अशा असता एकएक नारी
शोभत नाही अबला पालुपद
घेईन उंच भरारी जीवनी
सारे माझे आकाश
घालीन गवसणी नभास
पाडीन नारी शक्तीचा प्रकाश
