STORYMIRROR

काव्य चकोर

Others

5  

काव्य चकोर

Others

सांता

सांता

1 min
281

पांढऱ्या शुभ्र दाढीतला सांता

आज आमच्या कॉलनीत आला..

आयाबायांचा अन् पोराटोरांचा

त्याच्या भोवती गराडा पडला..!!


मला दे, मला दे धोशा लावत,

पोरांनी एकच गलका केला..

अन् प्रत्येक हातावर देता देता

सांता त्यांच्यात रंगून गेला..!!


नकळत मीही शिरलो गर्दीत

अन् सांतासमोर हात पसरला..

मंद हसला सांता अन् म्हणाला

बेटा! बोल काय हवं तुला..??


मी सहज बोलून गेलो म्हटलं

सुख हरवलंय, मी शोधतोय त्याला..

माणुसकीशी नाळ जोडशील का पुन्हा?

निरागस बाल्य देशील का रे मला..!!


तो पुन्हा मंद हसला अन् म्हणाला,

हे बघ मी शोधलंय माझ्या सुखाला..

आता वेळ घालवू नको, चढव हा पेहराव

उचल ती पोटली अन् लाग कामाला..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन