सांज
सांज
1 min
121
दिवस आणि रात्रीमधली,
मध्यस्थ आहे सांज.
वेळ कशीही असली तरी
तटस्थ आहे सांज.
सोनेरी सुर्य किरणांची ती
साक्षी आहे सांज.
निळ्या नभांत रमण करणारी,
पक्षी आहे सांज.
नयन रम्य वातावरणाची
प्रेक्षक आहे सांज.
उष्णते पासुन रक्षण करणारी
रक्षक आहे सांज
दिवस मावळता होते आगमन ती
अतिथी आहे सांज.
न चुकता जी रोज येते ती
प्रचिती आहे सांज.
ॠतु असला कोणताही जरी
सांज आहे सांज.
सांजेचे वर्णन काय करावे
सांज आहे सांज.
