STORYMIRROR

vaishali vartak

Others

3  

vaishali vartak

Others

साखर

साखर

1 min
320

साखर म्हणाली चहाला                                

मारू नको फुकाच्या

तल्लफेच्या  गप्पा.

जो पर्यंत माझे ,

तुझ्यात नाही समर्पण,

लज्जतेत,तुझ्या येत नाही रंगत.


शीतपेयांना सुद्धा,

हवी असते गोडी माझीच.

एवढेच काय ? तिखट नमकीन,

पदार्थांना सुद्धा,

चव वाढविण्यास,

चिमुटभर हवी मीच


साखर पुडा समारंभ,

संबोधतात माझ्याच नावान.

लग्न सोहळा वा दिन मंगल,

सर्वत्र असते माझीच वर्दळ 


खडी साखर असो वा पिठी,

गुळी असो वा शुगर फ्री,

सर्व रुपात वसते मीच.

मधुरता गुणधर्म माझा

मी कधीच नाही सोडीत

म्हणून सांगते तुम्हाला

जिभेवर मलाच पेरा,

अन वाणीने, जग जिंका .


लहानान पासून थोरांना

आवड असते माझीच

 उगाच का ! सकाळच्या झोपेला

 देतात उपमा 'साखरेची'.


साखर म्हणजे काय ?

आनंद लुटण्याचे एक माप

कळता बातमी आनंदाची,

हातावर मला ठेवण्या

अन् तोंड गोड करण्या

धावपळ करविते मी सर्वांची .


ऊस गोड लागला,

म्हणून मुळापासून खाऊ नये.

गोडी माझी कितीही अवीट,

अतिरेकी सेवन करू नये .


 जयांची इच्छा शक्ति जोरदार

तयांना साध्य सर्व होणार

म्हणून तर तुम्ही म्हणतात

''साखरेचे खाणार त्याला देव देणार''

           



Rate this content
Log in