साहित्य
साहित्य
साहित्याच्या विविध त-हा
साज चढविती त्या भाषेला
भाव अंतरीचे मना - मनातले
सहज उमटती लिखाणा ' ते
साहित्याच्या दोन धारा
गद्य अन पद्य अमाप पसारा
नाटक ,कादंबरी ,लघुकथा
कविता, वा विनोदी वात्रटिका
तयात भर करिती व्यंगचित्रे
साहित्याचे च दर्शन घडते .
कोणी रचिती काव्यखंडे
तर रेखाटती आत्म चरित्रे
योजित करिता साहित्य संमेलने
विविध वाङमय येती सामोरे
मासिक , पाक्षिक , दैनंदिने
असती सर्वची ज्ञाना-र्जने.
ं
प्राकृत भाषेतील मायबोली
सुधा-रसापरि अभंग वाणी
ओतप्रत भक्ति -रसांची
सदा विराजमान ओठावरती .
दास रामाचे मनाचे श्लोक
सोप्या भाषेत गीतेचाच बोध
संस्काराची होतसे पूर्तता
साहित्याला लाभे समृघ्दता .
छंद , वृत्त , कोट्या ,समास
शृंगाराचा चढवी साज
वीर , करूणा , भय अन हास्य
असते सुंदर ललित वाङमय
असे नवरसांचे संपन्न साहित्य
भाषेला करिते सदा समृध्द
साहित्याच्या असती विविध त-हा
साज चढविती त्या भाषेला
