साहित्य सेवक
साहित्य सेवक
सेवा शारदेचीआहोत आपण । साहित्य सेवक ।
काम ते पावक । लिखाणाचे ।।
नित्य नेमे करु । शारदेची सेवा । मानू तोच मेवा । आनंदाने ।।
वाचना करिता । वाढे ज्ञान गंगा । मन राही चंगा । सदासाठी ।।
वाढवू लिखाण । करुया चिंतन । विचार मंथन । नित्यनेमे ।।
विविध प्रकार । असे साहित्याचे । जाणू वाङमयाचे । मनोभावे ।।
नाट्य कथा काव्य । असती प्रकार । करती विचार । सेवक तो ।।
साहित्य मेळावा । दावी प्रदर्शन । साहित्य दर्शन । साहित्याचे ।।
खरा तो सेवक । नेमाने लिखाण । देउनिया मान । शारदेला ।।
