रयतेचा महाराष्ट्र
रयतेचा महाराष्ट्र
1 min
11.7K
रवीकिरणाने क्षितिज जाई रे उजळुन
माझी मातृभुमी खंबीर पाय रोवुन ॥धृ॥
मायभुमीला करूनी वंदन
कर्तव्ये आपली घेऊ या जाणुन
कर्तव्यशील आपले प्रशासन
साहाय्य करू घरी हो राहुन ॥१॥
देश सेवाकाला सलामी देऊन ़
अभिमानाने ऊर येई रे भरून
माझ्या महाराष्ट्राला प्रणाम करून
मातृभुमीचा टिळा नतमस्तकी लावुन ॥२॥
आपण आपले रक्षक बनुन
निधड्या छातीनं शत्रुला नमवून
वावटळ हिमतीनं लावली परतवुन
गनिमी काव्याने घेऊ या जिंकुन ॥३॥