रुसलेला पाऊस
रुसलेला पाऊस
रुसलेल्या पावसाला मी प्रश्न विचारला, "का रे रुसलास तू? सांग तरी आम्हांंला..."
पाऊस काही बोलेना, त्याचं मौन काही सोडेना. विनवणी केली किती, तरीही तो मानेना.
मग मीही त्याच्यावर बसले गुपचूप रुसून. त्याच्याकडे न पाहता राहिले कोपर्यात बसून.
मग हळूच येऊन कानात बोलतो कसा,
"तुम्ही सर्वांनी केला वृक्षांचा घात असा..
मिळूनी वृक्षतोड करुन जंगले ओसाड केली
नवीन झाडे लागवडीची आठवण न राहिली.
ओसाड धरती पाहून काळीज माझं फाटलं.
मनी माझ्या मग विचारांच काहूर माजलं.
म्हटलं, धडा चांगला शिकवू सर्वांना.
मीच बरसणार नाही. मग कळेल त्यांना.
म्हणून मी रुसलो आहे आणि असाच रहाणार आहे.
मगच किंमत माझी कळेल.
त्यानंतर काय तो विचार करेल."
रुसलेल्या पावसाला वचन दिलं हरितक्रांतीचं
धरतीवर वृक्षांची लागवड करायचं.
रुसलेला पाऊस आता खूष झाला
आनंदाने तो मग धो-धो बरसू लागला.
