STORYMIRROR

Sandhyarani Kolhe

Others

4  

Sandhyarani Kolhe

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
216

रुढी, परंपरांच्या जाचात

पूर्वी स्त्री अडकलेली 

सावित्रीच्या कष्ट नि मेहनतीने

आजची स्त्री स्वावलंबी बनलेली


जुन्या प्रथांचा नाश करत

हिंमतीने उभी राहिली

शिक्षणाच्या सोबतीने आज

यशशिखरे जवळून पाहिली


अन्यायाविरुध्द आवाज उठवावा

हे तिने स्वतः मान्य केले

हक्कासाठी लढावे नि तो मिळवावा

हे स्त्रीने साध्य करुन दाखविले


स्त्री तुझा हक्क कोणीही

तुझ्यापासुन दूर करणार नाही

आलेल्या संकटाशी सामना कर

हार कधीच होणार नाही


सबला आहेस तू हे आता

समाजाला दाखवायचे आहे

कोणाच्या हाताची कठपुतली नाही

हे ब्रीदवाक्य मुलींसमोर ठेवायचे आहे


स्वतंत्र्य भारताची तू नारी

संसार नि देशाची तुझ्या हाती दोरी

दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्या 

महिषासुरमर्दीनेचे रुप घे भारी


Rate this content
Log in