पाऊस
पाऊस
1 min
13.5K
अवचित सुटला वादळ,वारा
सोबती घेऊनी या जलधारा
जोराचा पाऊस पडत होता
सर्वांचा मात्र गोंधळ उडत होता
धुंद पावसाने मन वेडावले
पावसात भिजण्या ते धावले
सृष्टी ही न्हाऊनी निघाली
चोहिकडे हिरवळ ही दाटली
वृक्षांना नवी पालवी फुटली
धुंद पावसाने फुलेही फुलली शेतकरीही या धुंदीने आनंदला पेरणीच्या कामाला तो लागला
पक्षांच्या ओठी गोड गाणी झर्याचे वाहे झुळझूळ पाणी निसर्ग हा नव्याने नटला
धुंद पावसाने तो ही सजला भिजण्याची ही आली मज्जा
घरी गेल्यावर मिळाली सजा
अंगअंग माझे हे शहारले
प्रिया मिलनाचे वेध लागले
पावसात भिजण्याची मज्जा न्यारी
मनी आनंदाला येई
उभारी कृपा आहे ही वरुण राजाची
सदा राहो ही छाया धुंद पावसाची
