रुबाब माझ्यावालीचा...
रुबाब माझ्यावालीचा...
1 min
220
जिथे चर्चा होतो माझ्या नावाचा...
तिथे रुबाब चालतो माझ्यावालीचा...
माझीवाली खूप खतरनाक
तिचं चिमणीसारख लहान नाक
मी झालो गुलाम एका दिलवालीचा...
नखऱ्यावर तिच्या झालो मी फिदा
खूप आवडते तिची रागीट अदा
नशा करतो मी सावळ्या रंगवालीचा...
तिला जर रस्त्यात कोणी छेडे
ती क्षणात लावे त्याच्या कानाला खडे
मी राजा एका साफ मनवालीचा...
तिच्यासमोर संगमलाही वाटे भीती
अशीच आहे तिच्या प्रेमाची नीती
माझ्या हातात हात एका गाववालीचा...
